पालघर

मणिपूर प्रकरणी पालघर मध्ये सर्वपक्षीय संघटनांचा निषेध मोर्चा….

पालघर – गेल्या तीन महिन्यापासून मणिपूर राज्यात जाळपोळ चालू आहे, आतापर्यंत अनेक नागरिकांचा त्यामध्ये बळी गेलेला आहे. हिंसाचार आणि सामूहिक बलात्काराच्या अनेक घटना पुढे येत आहेत. महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढण्यात आली होती. समाज माध्यमावरती व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर,त्याचे पडसाद देशभर उमटले. महिलांवरती अन्याय व अत्याचार सतत चालू असताना राज्य व केंद्र सरकार हिंसाचार व अत्याचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महिलांना विवस्त्रपणे त्यांची धिंड काढणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी संपूर्ण देशभरातून केली जात आहे.

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराचे पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पडसाद पडत आहेत. दि.१ ऑगस्ट हा पालघर जिल्हा निर्मिती वर्धापन दिन व महसूल दिन असताना पालघर जिल्ह्यातील सर्वपक्षीय व संघटना यांच्या माध्यमातून पालघर हुतात्मा चौक ते पालघर  रेल्वे स्थानकापर्यंत  निषेध रॅली काढण्यात आली होती.

पालघर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एका पत्राद्वारे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मणिपूर राज्यांमध्ये  राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी यंत्रणा तयार करावी,  लैंगिक हिंसाचार आणि महिलांना विवस्त्र करून धिंड  काढणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी  सर्व पक्षीय, संघटनेचे पदाधिकारी, रमाकांत पाटील,काँग्रेस चे प्रवक्ते,राष्ट्रीय पँथर्स आघाडी चे अध्यक्ष अविष राऊत, आदिवासी एकता परिषदेचे काळुराम काका धोडदे, डॉ.सुनील पऱ्हाड ,कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो,युवा एल्गार आघाडीचे अध्यक्ष अँड.विराज गडग,प्रकाश पाटकर, मोठ्या संख्येने महिला व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आज पालघर जिल्हा निर्मिती दिवस असताना मणिपूर महिलां लैंगिक अत्याचार व हिंसाचार प्रकरणी पालघर जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी,बहुजन विकास आघाडी, शिवसेना (ठाकरे गट),आदिवासी एकता परिषद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कष्टकरी संघटना, राष्ट्रिय पँथर्स आघाडी,युवा एल्गार आघाडी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच इतर राजकीय पक्ष व संघटना यांच्या माध्यमातून निषेध रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page