पालघर

मालगाडीचे डबे रुळावरून घसरले…

Palghar – मालगाडीचे ४ डबे रुळावरून घसरले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या मागच्या भागातून ४ डबे रुळावरून घसरले.

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. हि मालगाडी बोईसर रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये माल खाली करण्यासाठी आली होती.

दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी, अधिकारी,पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page