रेल्वे स्थानकात ६० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार…

Mumbai – घाटकोपर रेल्वे स्थानकात एका ६० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तपास करत २५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला कामासाठी आपल्या मुलीसोबत घाटकोपर येथे आली होती. काम झाल्यानंतर दोघीजणी रात्री घरी जाण्यासाठी घाटकोपर स्थानकावर पोहोचल्या. त्यानंतर मुलगी फलाट क्रमांक २ वर गाडीची वाट पाहत असताना, रात्री सुमारे 11:12 वाजता सदर महिला स्थानकातील सार्वजनिक शौचालयात गेली.

त्यावेळी काही सेकंदांतच २० ते २५ वयोगटातील एक तरुण शौचालयात शिरला आणि त्याने आतून दार बंद केले. महिलेवर लैंगिक अत्याचार केला तिने प्रतिकार केला असता तिच्या कपाळावर मारले. आणि त्यानंतर तो पसार झाला.
महिलेने घडलेला प्रकार लोहमार्ग पोलिसांना सांगितला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ स्थानक परिसर तसेच घाटकोपर मेट्रो स्थानकाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आणि सापळा रचून घाटकोपरमधील असल्फा भागातून तस्लीम नूर मोहम्मद याला अटक केली.
दरम्यान, घटनेचा पुढील तपास सुरु आहे.



