डोंबिवली

रिक्षात विसरलेली बंदूक; विष्णु नगर पोलिसांनी दिली शोधून…

Dombivali : एका निवृत्त सैनिकाची रिक्षात विसरलेली बंदूक विष्णु नगर पोलिसांनी दीड तासात शोधून दिली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, एका निवृत्त सैनिकाची सिंगल बोर बंदूक रिक्षात विसरल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती.

भरत चव्हाण हे निवृत्त सैनिक असून मुंबईतील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी सकाळच्या सुमारास त्यांनी डोंबिवली पश्चिमेतून रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा पकडली. आणि आपली बंदूक रिक्षाच्या मागील बाजूस ठेवली. परंतु रिक्षातून उतरताना ते बंदूक रिक्षातच विसरले. थोड्यावेळाने त्यांच्या बंदूक रिक्षात विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ विष्णु नगर पोलीस ठाण्यात बंदूक हरवल्याची तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत विष्णु नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनखाली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षा शोधली आणि त्यानंतर रिक्षाचालक दिनेश प्रजापती याच्याशी संपर्क साधून रिक्षात विसरलेली सिंगल बोर बंदूक भरत चव्हाण यांच्या ताब्यात परत दिली.

दरम्यान, विष्णु नगर पोलिसांच्या या कामगिरीचे आणि रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page