डोंबिवली

डोंबिवलीत जुन्या वादातून तरुणाची हत्या…

DOMBIVALI – डोंबिवलीत जुन्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील टेल्कोसवाडी परिसरात सोमवारी (ता. १९) रात्री हि घटना घडली.

याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी हर्षद गिरी याला अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. साहिल गायकवाड असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

सनी सिंह आणि साहिल गायकवाड हे मित्र असून साहिलने सनी सिंह याला मावसभाऊ गुड्डू (अर्थव) हिवाळे याच्याशी झालेल्या भांडणाची माहिती दिली होती. या वादात मारहाण झाल्याचेही सांगितले. दुसऱ्या दिवशी आरोपी दिशांत गायकवाड याने भांडण मिटवण्यासाठी साहिल गायकवाड याला डोंबिवली पश्चिमकडील टेल्कोसवाडी येथे भेटण्यासाठी सांगितले. आपापसात तडजोड करत भांडण मिटल्याचे सांगितल्याने त्यावेळी दोन्ही गट तेथून निघून गेले.

मात्र झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पुन्हा रात्री पावणे अकराच्या सुमारास साहिल आपल्या मित्रांसह सखाराम कॉम्प्लेक्स टेल्कोसवाडी येथे आला. हर्षल गिरी, दिशांत गायकवाड, चिराग सावंत ,कमलेशसह एक अल्पवयीन मुलगा त्या ठिकाणी आले. पुन्हा साहिल आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला.

त्यावेळी हर्षल गिरी, दिशांत गायकवाड, चिराग सावंत अल्पवयीन मुलगा आणि कमलेशने साहिलला मारहाण सुरू केली. साहिलसोबत असलेल्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यादरम्यान हर्षल गिरीने धारदार चाकूने साहिल्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास विष्णु नगर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page