मुंबई

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात राजस्थानमधून तिघांना अटक…

mumbai – अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात राजस्थानमधून तिघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या कोटा शहरातून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने हि कारवाई केली.

आरोपी एक्सप्रेसने नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. राजस्थान पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने कोटा रेल्वे स्थानकावर सापळा रचून अवघ्या १५ मिनिटांत त्यांना पकडले. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून दोन जण मूळचे हरियाणा तर, एक बिहारमधील रहिवाशी आहे.

रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात दोन जणांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. परंतु टायगरचा चालक आणि एक व्यक्ती जखमी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page