मुंबई
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार…

MUMBAI – बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुहूतील पुष्पा पार्क परिसरात ही घटना घडली असून, टायगर श्रॉफ फुटबॉल मॅच खेळून घरी परतत असताना तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला.

दोघांना गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनेचा पोलीस तपास करत आहेत.



