ठाणे

गोडाऊन मध्ये चोरी करणारे पाचजण जेरबंद…

Thane – भिवंडीतील एका गोडाऊनमध्ये घरफोडी चोरी करणाऱ्या पाच जणांना नारपोली पोलिसांनी अटक करून एकूण २४,८७,०००/- रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला. शौकत उर्फ वसीम अकबरअली खान, अब्दूल हासिम वदुत खान, गयासुद्दीन सलाहुद्दीन चौधरी, सलमान शाबान अली खान आणि अंबिया सजाउद्दीन मिर्झा अशी या पाच जणांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, अज्ञात इसमाने भिवंडीतील राहनाळ येथील एका गोडाऊनचे कुलूप तोडून १४,४४,०००/- रू. किमंतीचे लिड मेंडल, बिसमत मेटल, सोल्डर मेटल व डि.व्ही.आर. घफोडी चोरी केली असल्याबाबत नारपोली पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १३४९/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१(३) ३३१ (४) ३(५) प्रमाणे दिनांक दि. १२/११/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर पाच जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरलेले टेम्पो तसेच रूपये १४,३७,०००/- किमंतीचे लिड मेटल, बिसमत मेटल, सोल्डर मेटल असा एकूण २४,८७,०००/- रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदर प्रकरणी पाचही जणांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page