मुंब्रा पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई…

Thane – मुंब्रा पोलिसांनी सम्राट नगर परिसरात धडक कारवाई करत ४ परदेशी नागरिकांना अटक केली असून, त्यांच्याकडून १ कोटी ५० लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचे १.४९९ किलो मेफेड्रोन (MD) आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
रशीद मुजम्मिल सईद, हसन न्युमबे अली, केव्हीन अडोल्फ वोसा, ओबीअली अलेक्स झेंडर चीडीबेरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील तिघेजण टांझानियन देशातील आहेत तर एकजण नायजेरीया देशातील आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हददीत अंमली पदार्थ विक्री व सेवनाच्या कारवाईच्या अनुषंगाने ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सदर अंमली पदार्थ बाळगणे, विक्री व सेवन करणा-या इसमांन विरोधात कायदेशीर कारवाई करून त्याचे समुळ उच्चाटन करण्याबात आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस उप. आयुक्त, परि-१, ठाणे यांनी मुंब्रा भागात राहणाऱ्या नायजेरियन लोकांची माहीती घेऊन रेड करण्याबाबत सूचना दिल्या.

त्याअनुषंगाने मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीतील सम्राट नगर या ठिकाणी नायजेरीयन लोक राहत असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून सदर चौघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून १) ३५,२५,०००/-रू किंमतीची व ३५२.५ गॅम वजनाची ब्राऊन रंगाची मोफेड्रॉन (एम.डी. पावडर) २) १,१४,६५,०००/-रू किंमतीची व १ किलो १४६ ग्रॅम वजनाची पांढरी/ब्राउन सारखी मेफेड्रॉन (एम.डी. पावडर) आणि मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे व इतर साहीत्य असे एकूण १,५०,२७,५००/- रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
तसेच सदर चौघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १९५३/२०२६ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २२ (क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि सदर आरोपींना ०५/११/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे.
सदर यशस्वी कारवाई आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, अशोक दुबे, अपर पोलीस आयुक्त, बाळासाहेब पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, ठाणे, संकेत देवळेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक/ गणेश जवादवाड, मपोनि वृषाली पवार, सपोनि विनायक माने, पोउपनिरी अमोल सुर्यवंशी, ग्रेड पोउपनि रामकृष्ण मुणगेकर, पोहवा रतिलाल वसावे, पोहवा प्रदीप कांबळे, पोहवा संदीप थोरात, पोहवा संतोष गायकवाड, पोहवा सतिश खाबडे, पोहवा निलेश पाटील, पोशि अण्णासो एडके, पोशि दिगंबर सुर्यवंशी, पोशि गणेश सपकाळे, पोशि सुनिल आव्हाड, पोशि शंकर वारकड, मपोशि साक्षी कुतळ यांनी केली आहे.
दरम्यान, गुन्हयाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विनायक माने हे करीत आहेत.



