मुंबई

अमरावती शिक्षक मतदारसंघात ९१ टक्के तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ६४ टक्के मतदानाची नोंद…

अंतिम आकडेवारी छाननीनंतर जाहीर होणार…

mumbai – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर व दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान पार पडले. उपलब्ध तात्पुरत्या आकडेवारीनुसार अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात ९१ टक्के, तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ८५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ६४ टक्के, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात ६२ टक्के आणि औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात ५८ टक्के मतदान झाले आहे.

मतदानाची ही आकडेवारी तात्पुरती असून, मतदान पथके परतल्यानंतर त्यांच्याकडील नमुना १७-सीची छाननी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदानाची टक्केवारी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारी अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतरच मतदानाचे अंतिम प्रमाण स्पष्ट होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page