मुंबईतील तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचं लोकार्पण…

mumbai – मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागातील विद्याविहार रेल्वे स्थानकावरील लालबहादूर शास्त्री मार्ग आणि रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा रेल्वेपूल, शीव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी जंक्शन ते चित्रनगरीपर्यंतच्या उड्डाणपुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं लोकार्पण करण्यात आलं.
मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यात येत आहे. या गतिमान पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात पोहचण्यासाठी ‘५९ मिनिटात मुंबई ‘ संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या ‘मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी’च्या कामामुळे वेगवान संपर्क जोडणीसह नागरिकांच्या ‘इज ऑफ लिविंग’ मध्ये कमालीची सुधारणा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शीव रेल्वे पूल
हा ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित झाल्यामुळे आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान ५ व्या व ६ व्या रेल्वे मार्गिकेच्या विस्तारासाठी त्याची पुनर्बांधणी हाती घेण्यात आली.यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होईल. शीव पूर्व आणि शीव पश्चिम भागांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, पूर्व द्रुतगती मार्ग, धारावी आणि वांद्रे यांच्या सुलभ जोडणी. प्रकल्पाचा खर्च रेल्वे भाग: रु. ३३.५१ कोटी आणि पोहोच रस्ता रु. ३१.६२ कोटी. पुलाचे काम अंदाजे ४ महिने अगोदर काम पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे पुलाची एकूण लांबी ५४.५ मीटर व रुंदी २६ मीटर (४९६ टन वजनाचे २ ‘सेमी थ्रू स्टील गर्डर’). पोहोच रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड (६५ मी), धारावी (११० मी) आणि एल.बी.एस. रोडच्या दिशेने (९७ मी) लांबी. एल.बी.एस. मार्ग व संत रोहिदास मार्गावर पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.सॉलिड अप्रोच व जमिनीला मजबुती देण्यासाठी ‘टच पाईल्स’ चा वापर करण्यात आला आहे.
विद्याविहार उड्डाणपूल (पूर्व व पश्चिम जोडणारा)
विद्याविहार पूर्व आणि पश्चिम परिसराला थेट जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे या पुलाचे बांधकाम करण्यात आले. घाटकोपर स्टेशनजवळील उड्डाण पुलावरील वाहतुकीचा ताण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. पुलाचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आले आहे. टप्पा एक मध्ये रेल्वे हद्दीतील सेवांची पुनर्स्थापना व ९९.३४ मी लांबीच्या दोन तुळ्यांची स्थापना करण्यात आली. तसेच टप्पा २ मध्ये पूर्व व पश्चिम बाजूच्या ५०० मी लांब सेवरस्त्यांचे बांधकाम पुलाची एकूण लांबी ६०० मीटर असून रुंदी १५.५० मीटर ते १७.५० मीटर आहे.
पूर्वेकडील आर. सी. मार्ग आणि पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्ग यांमधील प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांवरून अंदाजे १० मिनिटांवर येणार आहे.

गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्यावरील उड्डाणपूल
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये जलद व सुरळीत वाहतूक सुविधा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत सहज व जलद पोहोच, ए. के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी रोड आणि हॉटेल रत्नागिरी जंक्शन परिसरातील प्रमुख वाहतूक कोंडी दूर होईल.
गोरेगाव पूर्व येथील रस्ता १.२६ किमी लांबीचा, सहा मार्गिकेचा उड्डाणपूल. पूर्वनिर्मित बॉक्स आकाराचे काँक्रीट सेगमेन्ट. उड्डाणपुलावर पी ७ ते पी ११ दरम्यान वक्राकार पोलादी स्पॅन आणि गुंतागुंतीची बहुदिशात्मक रचना. भूस्तराच्या स्थितीनुसार पाईल्स आणि ओपन फाऊंडेशनची सोय.



