डोंबिवली
डोंबिवलीत तरुणाचा खून; तिघांना अटक, दोन अल्पवयीन ताब्यात…

dombivali – डोंबिवली पश्चिमेत झालेल्या एका तरुणाच्या खून प्रकरणात विष्णु नगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहेत.
सोमवारी रात्री डोंबिवली पश्चिम टेल्कोसवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. साहिल गायकवाड असे या तरुणाचे नाव असून, याप्रकरणात ६ जणांनविरुद्ध विष्णु नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.



