महाराष्ट्र
भरधाव कारची दुचाकींना धडक….

PUNE – पुण्यात एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवत तीन ते चार दुचाकींना धडक दिली असल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरातील पौड रोडवर, MIT कॉलेज जवळ गुरुवारी रात्री हा अपघात घडला. एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत तीन ते चार दुचाकींना जोरदार धडक दिली. भरवस्तीत कारने दुचाकींना जोरदार धडक दिल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, कारच्या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर तेथील नागरिकांनी या तरुणाला गाडीतून खाली उतरवलं आणि घेरलं. त्यानंतर सदर तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले.



