महाराष्ट्र

Pune : शिवाजी नगर कोर्टाबाहेर गोळीबार, कोयत्याने हल्ला…

Pune – शिवाजीनगर जिल्हा कोर्टाच्या गेट क्रमांक चार बाहेर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दोन दुचाकींवरून आलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जामिनावर बाहेर आलेल्या तरुणावर चौघांनी पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळ्या न सुटल्याने हल्लेखोरांनी कोयत्यांनी त्याच्यावर सपासप वार केले. आणि तेथून ते पळून गेले. मंदार किवळे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, कोर्टाच्या बाहेरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या घटनेमुळे पुणेकरांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page