महाराष्ट्र

उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार….

Ulhasnagar – उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन परिसरात दोन ते तीन राऊंड फायर झाले. आणि यात एकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव हरीश गजवानी असं आहे.

रेल्वे स्टेशनला लागून असणाऱ्या कॅम्प 4 परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. दोन जणांनी हरीश गजवानी यांच्यावर पिस्तुलातून दोन ते तीन राऊंड फायर केले, आणि ते दोघेही तेथून पळून गेले. यात हरीश गजवानी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page