महाराष्ट्र
खोपोलीत खासगी बसचा भीषण अपघात…

khopoli – मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खोपोली शिळफाटा येथे एका खाजगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात खासगी बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने १२ ते १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खोपोली शिळफाटा येथे दुपारी ही घटना घडली. गुजरात ट्रॅव्हल्सची ही बस सूरतहून पंढरपूरच्या दिशेने निघाली होती.

त्यावेळी हि बस खोपोली शिळफाटा येथे आली. आणि अचानक वाहन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हि बस समोर येणाऱ्या वाहनांना धडक देत गेली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बस चालकाला ताब्यात घेतले.



