डोंबिवली

Dombivali : ठाकुर्लीतून एका नक्षलवाद्याला अटक…

Dombivali – महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत, झारखंड मधील कुप्रसिद्ध फरार नक्षलवाद्याला अटक केली आहे. झारखंड सरकारने त्याच्यावर तब्बल १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

संजय सरोज यादव ऊर्फ संजय गोदराई ऊर्फ बुधराम असे याचे नाव असून, त्याला डोंबिवली जवळील ठाकुर्ली परिसरातून अटक करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून तो ठाकुर्ली परिसरात आपली ओळख लपवून राहत होता.

संजय ठाकुर्ली मध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं हि कारवाई केली. त्यानं झोनल समितीचा सदस्य असल्याचं कबूल केलं असून, त्याला पुढील कारवाईसाठी झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

दरम्यान, एटीएसच्या या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून या नक्षलवाद्याचा घातपाताचा कट होता का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page