ठाणे

सॅटिस पुलाच्या छतावर अडकलेल्या व्यक्तीची सुटका…

Thane – ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस पुलाच्या छतावर अडकलेल्या एका व्यक्तीची ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने संयुक्तरीत्या कार्यवाही करत सुखरूप सुटका केली. सदर घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

आज सकाळी 8.58 वाजता सॅटिस पुलाच्या छतावर एक व्यक्ती अडकल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तसेच ठाणे नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सदर व्यक्तीचे नाव राम इंगोळे असून, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने त्यांना सॅटिस पुलाच्या छतावरून सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील कार्यवाहीसाठी ठाणे नगर पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसून, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे सदर व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page