ठाणे
ठाण्यातील तलावपाळी परिसरातील शॉपला भीषण आग…

thane – ठाण्यातील तलावपाळी परिसरातील एका शॉपला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, चिंतामणी चौकातील प्रीती सॅन्डविच कॉर्नर शेजारी असलेल्या शॉपला भीषण आग लागली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आगीने रौद्ररुप धारण केले असून, धुराचे मोठे लोट सर्वत्र पसरू लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



