Pune : वैशाली, रूपाली हॉटेलचे परवाने रद्द…

Pune – एफ.सी. रोडवरील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंट यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळल्याने दोन्ही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएच्या पथकांनी किचनची तपासणी केल्यानंतर हि कारवाई केली.

माहितीनुसार, स्वयंपाकघरातील अस्वच्छता, उघड्यावर अन्नपदार्थांची साठवणूक आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे FDA कडून ही कारवाई करण्यात आली आहे. तपासणीत हॉटेल वैशालीला ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाले.
रूपाली रेस्टॉरंटमध्येही अस्वच्छता, अयोग्य अन्नसाठवणूक आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव होता. दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. परवाने पूर्ववत होईपर्यंत विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरीवर बंदी घालण्यात आली आहे.



