ठाणे

जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक…

Thane – जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीस मुंब्रा येथून खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. समीर रफीक शेख उर्फ समीर कालीमान असे याचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी ६ गुन्हे उघडकीस आणेल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नौपाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर आरोपीचा शोध मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत घेत असताना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेहमानी दवाखाना दारूफला मस्जिद जवळून समीरला अटक केली.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नौपाडा पो ठाणे गुन्हा रजि क २५२/२०२६ बीएनएस कलम ३०९ (४) ३, (५) हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच
या व्यतिरिक्त चितळसर मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं १) १४५/२०२५ बीएनएस कलम ३०९ (४), ३, (५) व २) ४५९/२०२५ बीएनएस कलम ३०९ (४), ३, (५) हे गुन्हे केले असल्याचे कबूल केले.

तसेच नवी मुंबई येथील तुर्भे पोलीस ठाणे गुन्हा रजि कमांक १) २६०/२०२६ बीएनएस कलम ३०४ (२), २) २६१/२०२६ बीएनएस कलम ३०४ (२),
३) २६३/२०२६ बीएनएस कलम ३०४ (२) प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली.

सदर प्रकरणी समीर रफीक शेख उर्फ समीर कालीमान याला अटक करून पुढील कारवाई करीता नौपाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा,ठाणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ रोहन म्हात्रे, पो.हवा राणे, पोहवा हिवरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page