देश

पंजाबमध्ये ट्रेनला भीषण आग; ४ डब्बे जळून खाक…

Desh – पंजाबहून बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ट्रेनचे ४ डब्बे जळून खाक झाले आहेत.

पंजाबमधील पटियाला-राजपुरा जवळ सराई बंजारा येथे हि घटना घडली. धावत्या ट्रेनला आग लागल्यानं प्रवासी घाबरले होते. जीव मुठीत धरून हे प्रवासी घाबरून सैरावैरा पळू लागले. काही प्रवासांनी धावत्या ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. आग लागताच ट्रेन थांबवण्यात आली त्यानंतर प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन पंजाबहून बिहारकडे जात होती यावेळी पटियाला येथे या रेल्वेला भीषण आग लागली. धुराचे लोट वेगाने पसरले आणि प्रवासी घाबरून खाली उतरू लागले. आगीचे अनेक भयानक व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान, दिवाळीसाठी रेल्वेगाड्या खचाखच भरलेल्या असतानाच हा अपघात घडला. सध्या आग नियंत्रणात असून, आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page