देश

व्यापारांना मोठा दिलासा; १५ ऑक्टोबर पासून लागणारे MDR शुल्क दिवाळीनंतर…

desh – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) डिजिटल व्यवहारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. UPI द्वारे २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी व्यवहारांवर प्रस्तावित असलेला ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR १५ ऑक्टोबर ऐवजी आता दिवाळीनंतर लागू केला जाणार आहे. तांत्रिक अडचणी, सणासुदीची उलाढाल आणि व्यापारी संघटनांच्या मागणीमुळे हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला.

हा निर्णय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या UPI अँड सर्व्हिसेस स्टिअरिंग कमिटीनं घेतला आहे. या शुल्काच्या अंमलबजावणीची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि अर्थ मंत्रालयाकडे उद्योग क्षेत्र, व्यापारी संघटना, फिनटेक कंपन्या आणि पेमेंट ॲग्रीगेटर्सनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी हे शुल्क १५ ऑक्टोबर पासून लागू होणार होतं. मात्र, दिवाळीच्या काळात होणारी खरेदी आणि डिजिटल व्यवहार सुरळीत सुरू राहावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page