दरोडे टाकून लुटणारी टोळी गजाआड…

गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई…
Thane – मुंब्रा पोलीस ठाणेच्या हद्दीत तसेच टिटवाळा, वाशिंद, कुळगाव-बदलापूर परिसरातील बंगला व फार्म हाउसवर दरोडे टाकून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण गुन्हे शाखा घटक ३ पोलिसांनी अटक केली आहे.
विजय तुळशीराम चव्हाण, लक्ष्मण उमाजी भोसले, सतीश सुरेश वाघे, नारायण रघुनाथ ठोंबरे, जयेश सुरेश कथोरे अशी या पाच जणांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बंगल्यात ८ ते ९ दरोडेखोरांनी प्रवेश करून त्या बंगल्यातील एका इसमास स्कु ड्रायव्हरचा धाक दाखवून, जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बंगल्यातील १,५५,०००/- रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने व ८४,०००/- रूपये दरोडा टाकून घेऊन गेले असल्याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात, गुन्हा रजि. नंबर २०६४/२०२६ भा. न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(२), ३०७, ३१२, ३३१ (४), ३३२ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा, घटक-३ कडून करण्यात येत होता. दरम्यान, सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर पाच जणांना अटक केली. आणि पुढील तपासकामी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
दरम्यान, सदर आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, पंजाबराव उगले, सह पोलीस आयुक्त, गुन्हे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध- १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, कल्याण गुन्हे शाखेचे सपोनि/गणेश दळवी, सपोनि/सर्जेराव पाटील, पोउपनि/किरण भिसे, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विलास कडु, विजय जिरे, अदिक जाधव, दत्तप्रसाद महाजन, सुधीर कदम, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, सचिन कदम, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, युवराज ठेपणे, प्रविण किनरे, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, महिला पोलीस अंमलदार मंगल गावित, पुनम खरात, चालक सपोउपनिरी अमोल बोरकर, उल्हासनगर गुन्हे शाखेचे सपोनिरी/श्रीरंग गोसावी, पोउपनि/अशोक पवार, सफौ/बबन बांडे, सफौ/सुरेश जाधव, पोहवा/अशोक थोरवे, पोहवा/राजेंद्र थोरवे, पोहवा गणेश गावडे, पोहवा / रितेश वंजारी, पोहवा/प्रकाश पाटील, पोशि / रामदास उगले, चापोशि/अविनाश पवार यांनी केलेली आहे.



