ठाणे
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल हॅक…

Thane – ठाणे पोलीस आयुक्त आशितोष डुंबरे यांचा मोबाईल हॅक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मोबाईल हॅक करुन डुंबरे यांच्या वॉट्सअपवरुन अश्लील व्हिडिओ स्टेटसला ठेवण्यात आलेत. या गंभीर प्रकाराने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डुंबरे यांच्या अधिकृत व्हॉट्सॲप स्टेटसवर अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स पोस्ट करण्यात आल्या. जवळपास ५० मिनिटे या क्लिप्स चालू होत्या. स्टेटसवर ठेवण्यात आलेले व्हिडीओ डिलीट करता येत नव्हत्या. काही वेळानंतर या पोस्ट डिलीट करण्यात आल्या.
दरम्यान, आयुक्तांचा मोबाईल हॅक करणाऱ्याचा हॅकरचा ठाणे पोलिसांकडून शोध सुरू आहे



