मफलरमॅन म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो…

Mumbai – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी अनेक गंभीर खुलासे केले आहेत, मात्र मफलर मॅन म्हणून ज्यांचा उल्लेख रोहित पवार यांनी केला होता ते मफलर मॅन म्हणत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो त्यांनी दाखवला. देवेंद्र फडणवीस या प्रकरणातील आरोपींना वाचवत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच VRS कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे व्ही के सिंहच्या जयपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. त्यांनीच या कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि यामध्ये जर चूक असेल तर सरकारने तपास करावा, असं आव्हानही रोहित पवार यांनी केलं आहे. या सरकारने व्ही के सिंह आणि त्याच्या कंपनीला जरी वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी आमचं सरकार आलं तर त्याला सोडणार नाही. त्यांचा हा पुतण्या कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या व्यक्तीने घातपात केला असे मी म्हणत नाही मात्र वीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी तुम्ही मदत करत असल्याचा आम्हाला संशय आहे. व्ही के. सिंग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला होता. तुम्ही व्हीएसआर आणि VK सिंगला वाचवत आहात अशी आम्हाला शंका आहे. असेही रोहित पवार म्हणाले.
त्याचबरोबर रोहित पवार यांनी व्ही. एस. आर. कंपनीचे देशाबाहेरील संपत्ती आणि गुन्हेगारी संबंध असल्याचा दावा केला. व्हीएसआर असं कोण लागून गेलं की त्याला वाचवलं जातंय? तर त्याच्याजवळ पैसा आहे. हा पैसा कसा आहे? ते तुम्हाला दाखवून देतो, असं म्हणत रोहित पवारांनी प्रेजेन्टेशन सादर केलं.



