महाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांच्या भीतीने पळालेल्या मुलाचा मृत्यू …

Badalpur भटकी कुत्री मागे लागल्याने पळत सुटलेल्या एका मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हर्षल शिंदे असे याचे नाव असून, इयत्ता बारावीत तो शिकत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हि घटना बदलापूर पश्चिमेतील शनी नगर परिसरात घडली. हर्षल क्लासवरून मित्रांसोबत घरी जात होता. त्यावेळी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक त्यांचा पाठलाग केला. हर्षलने कुत्र्यांच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. आणि जवळच असलेल्या एका दुकानात तो शिरला मात्र, काही क्षणांतच तो अचानक जमिनीवर कोसळला.

घटनेची माहिती मिळताच क्लासच्या शिक्षकांनी ताबडतोब त्याला रुग्णालयात नेले मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तपासणीनंतर डॉक्टरांनी हर्षलला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेनंतर बदलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा जीवघेण्या घटना घडून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page