महाराष्ट्र
सप्तशृंगी गडावर FDAची धडक कारवाई…

NASHIK – सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत असुरक्षित वातावरणात साठवून ठेवलेला तब्बल ₹५.६२ लाखांचा मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला.

या तपासणीत १३ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, अन्नपदार्थांचे १८ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. असुरक्षित वातावरणात साठवलेला आणि आवश्यक लेबल नसलेला १ हजार ४०८ किलो पामतेलयुक्त माव्यासदृश मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक विभागाच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिली.



