ठाण्यात ठाकरे सेनेचे शाखा प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या…

thane – ठाण्यात मानपाडा परिसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी (२९ सप्टेंबर) गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्णेकरांवर मानपाडा येथील कार्यालयाबाहेर हल्ला झाला.
ठाण्यातील मनाेरमानगर, मानपाडा दुर्गा चाैक भागात शाखे समोरच प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हि घटना मंगळवारी रात्री ९.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहेत.

हल्ल्यानंतर पूर्णेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून स्थानिक पक्षकर्ते आणि समर्थकांमध्ये व्यापक चिंता पसरली आहे.

दरम्यान, पूर्णेकर हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे ठाणे ‘विभाग प्रमुख’ होते. त्यांच्या हत्येबाबत कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. प्रदीप पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर यांची ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे या हत्येच्या कटामागील सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे.



