पालघर
आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना विषबाधा…
Palghar – डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील काही विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री या विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पहाटे काही विद्यार्थिनींना मळमळ होऊ लागली, उलट्या होऊ लागल्या. या विद्यार्थिनींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या विद्यार्थिनींची प्रकृती आता स्थिर असली तरी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.