राज्यात सलग तीन दिवस ड्राय डे…

mumbai – राज्यात सलग तीन दिवस ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला आहे. राज्यातील २९ महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. १६ जानेवारीला मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार १४ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका आहेत त्याठिकाणी ड्राय डे लागू करण्यात आला आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसारख्या महानगरपालिकांचा समावेश आहे.
राज्यात मतदानाच्या आधीचा दिवस म्हणजे १४ जानेवारी, मतदानाचा दिवस १५ जानेवारी आणि मतमोजणीचा दिवस १६ जानेवारी रोजी ड्राय डे असेल. म्हणजे १४ ते १६ जानेवारी यादरम्यान राज्यभरातील मद्यविक्रीची दुकानं, बार, परमिट रुम बंद राहतील. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यात बंदी आहे.



