नवी दिल्ली

मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता…

new delhi – दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची राऊस अव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने तपास केलेल्या या प्रकरणात विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणातून केजरीवाल आणि सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता करत न्यायालयाने सीबीआयला कडक शब्दांत फटकारले. सरकारी वकील ठोस पुराव्यांअभावी आरोप सिद्ध करु शकले नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मोठे कटकारस्थान आणि गुन्हेगारी हेतूचे दावे न्यायालयीन तपासणीत टिकाव धरू शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.

सीबीआयने या प्रकरणात एकूण 23 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने त्यांच्यापैकी कोणावरही आरोप निश्चित करण्यास नकार देत त्यांना निर्दोष मुक्त केले. विशेष म्हणजे सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याविरुद्ध (आयओ) विभागीय चौकशीचे आदेशही न्यायालयाने दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page