डोंबिवली
डोंबिवली – ठाणे बस सेवेला हिरवा कंदील…

dombivali – आता डोंबिवलीकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार आहे. डोंबिवली-ठाणे बस सेवेला KDMC परिवहन विभागाने मंजुरी दिली आहे.
KDMT मार्फत ४ मार्च २०२६ पासून प्रायोगिक तत्त्वावर डोंबिवली मोठागाव सर्कल ते ठाणे माजिवडा जंक्शन दरम्यान बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी याबाबत सतत मागणी केली होती. त्यांचा मागणीला यश आले असून, या निर्णयामुळे डोंबिवलीकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.



