अमेरिका, इस्रायलचा इराणवर हल्ला…

word – अमेरिका, इस्रायलने इराणवर हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. राजधानी तेहरान आणि इतर अनेक शहरांमध्ये स्फोट ऐकू आले. इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या कार्यालयाजवळही हल्ला झाला, तसेच राष्ट्रपती भवनालाही लक्ष्य करण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशनला ऑपरेशन रोअरिंग लायन असे नाव दिले असून, अमेरिकेनं जनतेचे संरक्षण हा मुख्य हेतू असल्याचे सांगितले. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनीही हल्ल्याची पुष्टी केली असून, देशात आणीबाणी जाहीर केली आहे.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणनंही अमेरिकन सैन्यतळांवर मिसाईल आणि ड्रोन वापरून प्रतिहल्ला केला आहे. कतार, कुवैत, संयुक्त अरब अमिरात आणि बहारिन यांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.
एअर इंडिया आणि इंडिगोने पश्चिम आशियामधील सर्व उड्डाणे स्थगित केली असून, प्रवाश्यांनी आपले फ्लाइट तपशील तपासूनच प्रवास करण्याची सूचना आहे.



