देश-विदेश
दुबईत तेजस विमान कोसळलं!…

dubai – दुबईमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. दुबई येथे सुरू असलेल्या दुबई एअर शो दरम्यान भारतीय हवाई दलाचे एचएएल तेजस लढाऊ विमान प्रात्यक्षिक उड्डाण करत असताना कोसळले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २:१० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तेजस विमान हवाई प्रात्यक्षिके करत असताना अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअरफील्डच्या दूरच्या बाजूला खाली कोसळले. दरम्यान या विमानाच्या पायलटबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.



