मुंबई

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर…

mumbai – बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे हा अर्थसंकल्प सुपूर्द केला. यंदाच्या अर्थसंकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत ८.७७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, एकूण ८०,९५२.५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी 81 हजार 449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी 44 हजार 826 कोटी 23 लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र उर्वरित 36 हजार 623 कोटी 09 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे.

महापालिका आयुक्तांनी या अर्थसंकल्पात महसूल वाढीवर भर देतानाच जकातीपोटी करावयाच्या भरपाईसाठी अनुदान सहायपोटी १५.५५०.०२ कोटी रुपये, विकास नियोजन खात्याकडून १२,०५०कोटी रुपयांचा महसूल प्रस्ताविला आहे. मालमत्ता कराचा महसूल ७,००० कोटी रुपयांवर प्रस्तावित केले आहे. गुंतवणुकीवर व्याजातून २५७२.२३कोटी रुपये, जल आणि मलनि:सारण करातून ३५७८. २६कोटी रुपयांचे महसूल अपेक्षित मानला आहे. याशिवाय अग्निशमन दलाकडून शुल्कापोटी ८७२.००कोटी रुपये, परवाना विभागाकडून ३८१ कोटी रुपये, शासनाकडील थकबाकीची रक्कम १४६१ कोटी रुपये अशाप्रकारे महसूल वाढीचे स्त्रोत दर्शवले आहेत..

मागील वर्षीपर्यंत २ लाख ३३ हजार कोटींच्या पायाभूत प्रकल्प कामांना मंजुरी दिलेली होती, आता ही रक्कम वाढून आता २ लाख ४४ हजार ५५२ एवढी झाली आहे.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे…

मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 80952.56 कोटींचा
मागच्या वर्षीपेक्षा (74,427 कोटी) यंदा 6,525 कोटी रुपयांची वाढ
BMC यंदा 81 हजार कोटींपैकी 36 हजार 623 कोटींच्या ठेवी मोडणार
BMC आरोग्य खात्यासाठी 7 हजार 456 कोटींची तरतूद
बेस्ट साठी 1 हजार कोटींची तरतूद
शिक्षण विभाग : ४२४० कोटी रुपये
रस्ते आणि वाहतूक विभाग : ८५०८ कोटी रुपयेआरोग्य विभाग : १९३५ कोटी रुपयेजल अभियंता विभाग : ४२७९ कोटी रुपयेपाणी पुरवठा प्रकल्प खाते : ६५२९ कोटी रुपये
फेरीवाल्यांना QR Code आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु
ऑक्टोबरपासून करमणूक कर लागू होणार
वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी 4 हजार कोटींची तरतूद
गोरेगाव मुलुंड लिंक रोड 2 हजार 650 कोटींची तरतूद
मनपा रुग्णालयांसाठी 1 हजार 62 कोटींची तरतूद
40 बाय 40 पेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना बंदी;
पदपथ आणि गच्चीवरील जाहिरातींनाही मनाई
राज्य शासनाकडे बीएमसीचे एकूण 10,948.58 कोटींची थकबाकी

नवीन योजना :

युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी अंतर्गत अधिक पादचारी अनुकूल व दिव्यांग अनुकूल पदपथ निर्माण करणार

भूमिगत वाहनतळ, स्मार्ट वाहनतळ

वायू प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजना

कचऱ्याचे उगमस्थानी विलगीकरण

कृत्रिम बुध्दीमत्तेचा अर्थात एअाय वापर करून विकासकामांचा कल अभ्यास

एआय कोच

मुंबईच्या प्रवेशमार्गावर भव्य प्रवेशद्वार आणि घड्याळ मनोरा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page