तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्यास अटक…

dombivali – अपघात झालेल्या एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्यास विष्णु नगर पोलिसांनी अटक केली आहे. सतीश कोरे असे याचे नाव आहे. तर तुषार शिंदे असे अपघात झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणकोली ब्रिज परिसरात तुषार शिंदे याचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याला शास्त्री नगर रुग्णालयात नेणाऱ्यांपैकी एकाने तुषार याच्या गळ्यातील ४२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेली होती.
त्यानुषंगाने तुषार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सतीश कोरे याला अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी विष्णु नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गहिनीनाथ गमे, सपोनि, प्रशांत मोरे, सचिन लोखंडे आणि पथक यांनी केली आहे.



