डोंबिवली ते ठाणे बस सेवा सुरु….

dombivali – डोंबिवली ते ठाणे नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMT) परिवहन विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर डोंबिवली – मोठागाव – स्वामीनारायण सिटी ते ठाणे अशी नवीन बस सेवा बुधवार ४ मार्च पासून सुरू करण्यात आली.

डोंबिवलीचे आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बसला हिरवा झेंडा दाखवला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मार्ग क्रमांक 80 अंतर्गत ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत फक्त 20 रुपयांत ठाण्याला पोहोचता येणार आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नातून हि बस सेवा सुरू करण्यात आली. या सेवेमुळे डोंबिवली आणि ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सदर प्रसंगी मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.



