kalyan
kalyan: आधारवाडी जेल मधील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळयात…

kalyan – आधारवाडी जेल मधील दोन जेल कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. शरद पानपाटील आणि सतीश भोसले अशी या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कैद्याला भेटवण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडे लाच मागितली होती. त्याअनुषंगाने एसीबीने सापळा रचून या दोघांना लाच घेताना रंगेहात पकडले असून, पुढील कार्यवाही सुरु आहे.



