kalyan

इराणी वस्तीत पोलीसांचे कोम्बिंग ऑपरेशन, अंमली पदार्थासह तिघांना अटक…

kalyan – इराणी वस्तीमध्ये पोलीसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून ८ लाख रूपये किंमतीच्या एम.डी अंमली पदार्थासह मोक्का, जबरी चोरी गुन्हयातील तिघांना अटक केली. यात १ पुरुष व २ महिला यांचा समावेश आहे. शमा तेहजीब इराणी, मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख आणि नफिसा हाश्मी इराणी अशी या तिघांची नावे आहेत.

माहितीनुसार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण यांनी ५ पोलीस पथक गठीत करून खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील इराणी वस्ती, आंबिवली कल्याण येथे कोंबिंग ऑपरेशन राबवून कारवाई केली.

सदर पोलीस पथकांनी खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून त्यामध्ये विशेषतः अंमली पदार्थ विरोधी गुन्हातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत १ पुरुष आणि २ महिला यांना अटक केली. शमा तेहजीब इराणी, मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख आणि नफिसा हाश्मी इराणी अशी या तिघांची नावे आहेत.

तसेच मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख यांच्या ताब्यात ८,००,०००/- रूपये (आठ लाख रूपये) किंमतीचा ४० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित अंमली पदार्थ ‘मेफेड्रॉन (एम.डी.) मिळून आला असून, सदर प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदर तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग संजय जाधव यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण अतुल झेंडे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे, सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग अशोक होनमाने, व.पो.नि. खडकपाडा पो.स्टे राजेंद्र खेडकर, व.पो.नि. बाजारपेठ पो स्टे गणेश न्हायदे, व.पो.नि. महात्मा फुले चौक पो.स्टे बळीराम परदेशी, व.पो.नि. कोळशेवाडी पो.स्टे नितीन पगार, पो.नि. प्रेमनाथ ढोले, स.पो.नि. अनिल गायकवाड तसेच पोलीस उप आयुक्त कार्यालयातील विशेष कार्यवाही पथक, खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक, कोळशेवाडी पो.स्टे. कडील एकूण १७ पोलीस अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकातील ५५ पुरुष व महिला अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page