मिसिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका उद्या तीन तास बंद…

mumbai – मिसिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 वाजे पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणारअसून, या कालावधीत देखभाल-दुरुस्तीची कामे तसेच मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक आहे.
या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. दरम्यान, कनेक्टिंग लिंकवरून मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.
वाहनचालकांनी नियोजित वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनचालकांनी हे लक्षात ठेवावे?
1. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक बंद राहणार.
2.पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गाने वळवली जाणार.
3.मुंबईकडून पुण्याकडे जाणारी कनेक्टिंग लिंकची मार्गिका सुरू राहणार.
4.वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे.
5.आपत्कालीन मदतीसाठी दिलेल्या नियंत्रण कक्ष आणि महामार्ग पोलीस क्रमांकावर संपर्क साधता येईल.



