महाराष्ट्र
Sangli : दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या…

sangli – सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विटाजवळील रेवणसिद्ध घाटात भीषण हा अपघात झाला. दोन एसटी बसची थेट समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन ते तीन मृत्यू तर 15 ते 16 जण गंभीर जखमी झाले आहेत.

यातील एक बस विटाहून भीव घाटाला जाणार होती. तर दुसरी बस विजापूरहून मेढ्याला जात होती. रेवणसिद्ध घाटात विटा येथून भीव घाटाकडे जाणारी आणि विजापूरहून मेढ्याकडे जाणारी एसटी बस समोरासमोर आली आणि दोन्ही बसची जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला.
दरम्यान, जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.



