महाराष्ट्र
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला…

maharashtra – महाराष्ट्रातील नांदेडमध्ये शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, नांदेड मधील गुरुद्वारा परिसरात सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला झाला. दर्शन घेऊन परतत असताना ही घटना घडली. हल्ल्यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ला रोखण्याचा प्रयत्न करताना पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे हे देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तसेच या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, हल्ल्याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



