kalyan

सराईत इराणी चोरास अटक; ९ दुचाकी जप्त…

kalyan – सराईत इराणी चोरास खडकपाडा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एकूण ९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. अब्बास सय्यद असे याचे नाव आहे.

महानगरपालिका डंपिंग जवळ, ९० फिट, वडवली रोड, गांधारी कल्याण पश्चिम येथून एक मोटारसायकल चोरी झाली असल्याबाबत गुन्हा रजि नं. ३९९/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अब्बास सय्यदला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त केली. सदर प्रकरणी पोलिसांनी एकूण ९ मोटर सायकली, (६,३५,०००/- रू किंमत) जप्त केल्या.

तसेच खडकपाडा पोलीस ठाण्यासह कल्याण, ठाणे शहरातील तसेच मुरबाड येथील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले. दरम्यान, अटक आरोपी अब्बास सय्यद हा कापुरबावडी व बदलापूर पोलीस ठाण्यातील जबरी चोरी सारखे मालमत्ते संबंधातील एकूण ३ गुन्हयात पाहीजे असलेला आरोपी आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रदेशिक विभाग, कल्याण संजय जाधव, पोलीस उपायुक्त परीमंडळ ३ कल्याण अतुल झेंडे, सपोआ कल्याण विभाग अशोक होनमाने यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांच्या देखरेखीखाली पो.नि.गुन्हे प्रेमनाथ ढोले, पो.नि.(प्रशा.) मारूती आंधळे, सपोनि/सतिश पाटील, पोउनिरी भुषण देवरे, पोहवा/ भोईर, पोहवा/ बुधकर, पोहवा/ लोखंडे, पोना/ वंजारी, पोशि/ बगाड, पोशि/ महाजन, पोशि/ राजगे, पोशि/ खंडाळे, पो.शि. / शिंदे, पो.शि./ पाटील यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page