अमेरिकेच्या H1B व्हिसा शुल्कात वाढ!…

new delhi – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने H1B व्हिसाच्या अर्जाच्या रकमेत वाढ केली आहे. कंपन्यांना आता हा व्हिसा मिळविण्यासाठी दरवर्षी $100,000 किंवा एक लाख डॉलर म्हणजे अंदाजे ८८ लाख रुपये शुल्क भरावा लागणार आहे. ही रक्कम अनिवार्य असून, नवीन अर्जासोबत भरावी लागणार आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम हा भारतीय व्हिसाधारकांवर होणार आहे. कारण यामध्ये जवळपास ७० टक्के भारतीयांचा समावेश होतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ओव्हल ऑफिसमधून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला उत्तम कामगारांची गरज आहे आणि या पावलामुळे ते येतील याची खात्री होईल. कंपन्यांना अमेरिकन कामगारांना कामावर ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, परंतु त्याच वेळी, विशिष्ट क्षेत्रातील अत्यंत कुशल परदेशी कामगारांसाठी मार्ग खुला राहणार आहे.
सध्या, H1B व्हिसासाठी नोंदणी शुल्क $215 (अंदाजे रुपये 1,900) आहे. फॉर्म 129 साठी व्यक्तींकडून $780 (अंदाजे रुपये 68,000) आकारले
जातात.