पालघर

मोटार सायकल चोरी करणारे दोघे गजाआड…

पालघर – मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पोलिसांनी अटक करून ५ मोटार सायकल जप्त केल्या. संतोष पाटील आणि गणेश मोरे अशी या दोघांची नावे आहेत.

संतोष पाटील आणि त्याचा मित्र गणेश मोरे हे पालघर- बोईसर परीसरातील मोटार सायकल चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून या दोघांना अटक केली.

सदर प्रकरणी पोलिसांनी ५ मोटार सायकल जप्त करून विविध पोलीस ठाण्यातील ५ गुन्हे उघडकीस आणेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page