२ पिस्टल, ४ जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांची कामगिरी…

thane – २ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे पोलिसांनी जप्त करून एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले.

गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पश्चिम, वागळे इस्टेट, साई पान शॉप समोर, फुटपाथवर, इंन्टरसिटी मॉलचे बाजूला या विधिसंघर्षित बालकास २ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसांसह (किंमत एकूण २,१४०००/-) ताब्यात घेण्यात आले. अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने त्याने हा मुद्देमाल जवळ बाळगला होता.
सदर प्रकरणी विधीसंघर्षित बालकावर वागळे इस्टेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. २०/२०२६. भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५ सह महा. पो. कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/सुनिल तारमळे हे करत आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) ठाणे, विनम घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक/शैलेश साळवी, सपोनि/सुनिल तारमळे, पोहवा/ ठाकुर पोहवा/ शिंदे, पोहवा/ जाधव, पोहवा/ गायकवाड, पोशि/ शेजवळ, मपोशि/ भोसले यांनी केली.



