६ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त…

thane – ठाण्यातील पश्चिम परिसरात खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा पोलिसांनी एकास अटक करून त्याच्याकडून ६ कोटी रुपयांचे हेरॉईन अंमली पदार्थ जप्त केले आहे. फरदीन गुलजार मुल्ला असे याचे नाव आहे.
एक इसम पश्चिमेतील घोडबंदर रोड वरील गायमुख परिसरात हेरॉईन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून फरदीन गुलजार मुल्ला याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून ६ कोटी ८६ लाख रूपये किंमतीचे एकूण २ किलो २८८ ग्रॅम वजनाचा हेरॉईन जप्त केले.
तसेच फरदीन गुलजार मुल्ला विरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ९७/२०२६ एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्हयात त्यास अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /सुनिल तारमळे हे करीत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध २, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, सपोनि /सुनिल तारमळे, सपोउनि / संदिप भोसले, पोहवा / आशिष ठाकुर, पोहवा/अभिजीत गायकवाड, पोना/सुमित मधाळे, पोहवा / भगवान हिवरे यांनी केली आहे.



