मुंबई
महापौरपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख ठरली…

mumbai – मुंबईसह राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. नगरविकास विभागाकडून यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. या सोडतीत प्रत्येक शहरात महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे, हे निश्चित केलं जाईल.
या आरक्षणाच्या आधारे संबंधित महानगरपालिकेत निवडणूक जिंकणारा पक्ष महापौरपदासाठी आपला उमेदवार नामांकित करणार आहे.
२२ जानेवारी रोजी मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता ही सोडत काढली जाणार असून, याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे.



