अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात…

mumbai – बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षेसाठी असलेल्या कारचा मुंबईत अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जुहू येथील थिंक जिमजवळ हा अपघात झाला. या घटनेत एकजण जखमी झाला आहे.
एका भरधाव मर्सिडीज कारने रिक्षाला जोराची धडक दिली, ज्यामुळे ही रिक्षा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनावर जाऊन आदळली. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय कुमारचा ताफा जुहू परिसरातून जात असताना हा अपघात झाला. अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारच्या मागे एक मर्सिडीज आणि एक रिक्षा होती. मर्सिडीजने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे रिक्षाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट अक्षय कुमारच्या सुरक्षा ताफ्यातील कारवर जाऊन आदळली. या अपघातात रिक्षाचं मोठे नुकसान झाले आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. दरम्यान, या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.



